अप-डाऊन जयपूर एक्स्प्रेसला मुदतवाढ

भुसावळ : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अप-डाऊन जयपूर एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अप 02731 हैदराबाद-जयपूर साप्ताहिक गाडी 3 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत तर डाऊन 02732 जयपूर-हैदराबाद साप्ताहिक विशेष गाडी 5 जोवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या गाडीला सिकंदराबाद , मेद्चल, काम रेड्डी , निजामबाद, धरमाबाद, मुदखेद, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, बर्हाणपूर, खंडवा, इटारसी, भोपाल, उज्जैन, नागदा, रतलाम, मंदसोर, नीमच, चित्तोगढ, चंदेरीया, भिल्वारा, अजमेर, फुलेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक टू टायर, सात थ्री टायर, नऊ स्लीपर तसेच दोन जनरल डबे जोडण्यात येणार आहेत.


