भुसावळात बेकायदा दारूची विक्री : आरोपी जाळ्यात


भुसावळ : शहरातील राहुल नगराजवळील आखाड्याच्या बाजुला बेकायदा देशी-विदेशी दारूची विक्री करणार्‍या विलास शांताराम धनगर (50, रा.गांधी चौक, साकेगाव, ता.भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या ताब्यातून दोन हजार 640 रुपये किंमतीच्या ऑफिसर चॉईस कंपनीच्या 22 बाटल्या तसेच 460 रुपये किंमतीच्या गोवा जीन कंपनीच्या सहा बाटल्या मिळून तीन हजार 100 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल असून तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहेत.


कॉपी करू नका.