भुसावळात उद्या संविधान बचाव समितीतर्फे मूक मोर्चा


भुसावळ : संविधान बचाव समिती भुसावळतर्फे गुरुवार, 26 रोजी सकाळी 1 वाजता रजा टॉवर ते प्रांताधिकारी कार्यालयादरम्यान विराट मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सर्व जाती, धर्म व सर्व पक्षीय लोकांचा समावेश असणार आहे. हा मोर्चा हा सर्व धर्मियांचे धर्म गुरु यांच्या नेतृत्वात निघणार असून सर्व धर्मीयांचे धर्मगुरू हे प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर करणार आहेत. मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संविधान बचाव समितीचे सदस्य हाजी सलीम सेठ चुडीवाले, फिरोज शेख, मुन्वर मुनव्वर खान, माजी नगरसेवक साबीर शेख, माजी आमदार संतोष चौधरी, नगरसेवक मुन्ना तेली, युनूस मामा, प्रा.दिलीप तायडे ,राजू तेलोरे, माजी आमदार नीलकंठ फालक, बबलू भाई किराणा व अय्यूब खान आदींनी केले आहे.


कॉपी करू नका.