जन कल्याणाकरीता संतांचा जन्म -संत गोपाळ महाराज

संत महंत आणि हजारो साधकानी वाहिली लक्ष्मण चैतन्य बापूजींना श्रद्धांजली
पाल : पालसारख्या छोट्याशा गावात बापूजींचा जन्म झाला व येथेच राहून विराण टेकडीवर भक्ती जोत पेटवली आणि पालसह देशभराला प्रकाशमान केले आणि आज देशभरात हजारो चैतन्य साधक त्या प्रकाशाच्या उजेडात आपले जीवन प्रकाशित करीत आहे . जन कल्याणाकरीरताच संत या धरावर जन्मला येतात, असे विचार गोपाल चैतन्य महाराज यांनी पाल येथे झालेल्या पूज्य लक्ष्मण चैतन्य बापूजी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त प्रवचनात व्यक्त केले. अखिल भारतीय चैतन्य साधक परीवाराचे प्रणेते आणि श्री वृन्दावन धाम आश्रमाचे संस्थापक परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या 10 व्या पुण्यतिथि सोहळा निमित्त संत महंत आणि हजारो अखिल भारतीय चैतन्य साधक परीवारा पाल वृंदावन धाम आश्रमात उपस्थित होते. प्रसंगी लक्ष्मण चैतन्य बापूजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
23 पासून विविध धार्मिक कार्यक्रम
23 डिसेंबरपासून नाम जप साधना शिबिर तसेच राजस्थानी कलाकृतीने सज्ज भव्य-दिव्य हरी धाम मंदिर वर्धापनदिवस तसेच बापूजींचे गुरुवर्य संत दगडुजी महाराज जयंतीनिमित्त हजारो दीपक लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी पाच वाजेपासून बापूजी समाधी दर्शनाला सुरवात झाली तसेच महाआरती, पादुका पूजन त्यानंतर गुरूदीक्षा व सकाळी 10 वाजेपासून देशभरातून आलेल्या संत महंतांचे श्रधावचन आणि पूज्य गोपाळ चैतन्य महाराज यांच्या अमृत वाणीततून सत्संगाचा अमृत लाभ भक्तांना घेतला.
यांची प्रसंगी उपस्थिती
प्रसंगी महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, स्वामी नारायण गुरुकुल सावदा येथील महंत भक्तिप्रसाद शास्रीजी महाराज, महानुभाव सावदा येथील संत श्री मानकर बाबाजी शास्री, दत्त आश्रम डोंगरदेचे स्वामी श्री स्वरूपानंदजी महाराज, बर्हाणपूर सांडसचे संत श्री सरसपुरीजी महाराज, राम मंदिर कुसुंबाचे महंत श्री भरतदास जी महाराज, मध्यप्रदेश खलघाट धामणोदचे महंत श्री कृष्णदास जी महाराज, नंदुरबार प्रकाशा येथील साध्वी कमल माताजी, कैलाश धाम झिरण्या (म.प्र) चे महन्त श्री राघवानंद भारतीजी महाराज, सांबरपाट जीन्सीचे महंत श्री गणेशगिरीजी महाराज, चाळीसगावचे संत श्री विशुद्धानद शास्री जी महाराज, रामदेवबाबा मंदिर भगवान पूरा (म.प्र) येथील महंत श्री रामदास त्यागीजी महाराज, हनुमान आश्रम सतवाड़ा (म.प्र) येथील महंत श्री संतोषदासजी महाराज आदींची उपस्थिती होती. भारतीय चैतन्य साधक परीवारातर्फे बापूजी पुण्यतिथीचे भव्य आयोजन करण्यात आले. सालाबादाप्रमाणे मुस्लिम बांधवांर्फे बापूजींच्या समाधीवर हिरवी चादर चढवून हिंदू-मुस्लिम राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले. आमदार राजुमामा भोळे, मध्यप्रदेश भिकनगावचे आमदार झूम सोलंकी, रावेर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, अतुल तडवी, गोविंद पाटील, गोपनीय शाखेचे करोडपती उपस्थित होते.


