भुसावळात राजपूत समाजातील गुणवतांचा 25 ऑगस्ट रोजी सत्कार
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी समित्यांचे गठण ; सोहळा यशस्वी करण्याचे आवाहन
भुसावळ : राजपूत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शहरातील वांजोळा रोडवरील स्टॉरलॉनमध्ये रविवार, 25 रोजी सकाळी नऊ वाजता होणार असून त्या संदर्भात नियोजन करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी समितीचे गठण करण्यात आले.
अशा आहेत विविध समित्या
बैठकीत विविध समित्यांचे गठण करण्यात आले. त्यात प्रवेश द्वार स्वागत समितीत भगतसिंग पाटील, अशोक पंडित पाटील, प्रवीणसिंह पाटील, ज्येष्ठ पत्रका संजयसिंग चव्हाण, यशवंत चौधरी, कृष्णा पाटील, नरवीरसिंह रावल, प्रमाणपत्र नोंदणी समिती- बी.एन.पाटील, यशवंत चौधरी, एन.एस पाटील, मंच समिती- चंदू चव्हाण, हर्षल अशोक पाटील (खंडाळा), भूषण राजपूत, सुनील चौधरी, अभिजीत पाटील, स्वागत समिती- चंदू बोरसे, पवन पाटील, गणेश पाटील, सोनी ठाकूर, जल पान व चहापान व्यवस्था समिती समाधान उघडू पाटील, गोपीसिंग राजपूत, राजेश महाजन, हेमचंद्र मोतीलाल पाटील, प्रवेशद्वार नाव नोंदणी समिती- नितीन पाटील, कंडारी, सुपडू महाजन, खडका, सूत्रसंचालन समिती- डी.एन.पाटील, बी.एन.पाटील , नरवीरसिंग रावल, भोजन समिती- हर्षल अशोक पाटील (खंडाळा), चंदू चव्हाण, भूषण राजपूत, अभिजीत पाटील, प्रचार समिती- चंदू चव्हाण, दामोदर राजपूत, हर्षल अशोक पाटील (खंडाळा), दलजीत चौधरी, नितीन पाटील, संजय सुरसिंग पाटील, सुपडू महाजन, रामसिंग पाटील, श्यामसिंग पाटील यांची निवड करण्यात आली. दरम्यान, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थिी द्यावी व कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.