अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वरणगावात उद्या निघणार झाक्या

वरणगाव : दि वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने वर्षभरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर या कार्यक्रमाची सांगता निमित्त वरणगाव शहरातून शुक्रवारी दुपारी अडीच वाजता झाक्या निघणार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात 1944 ला ग्रामीण भागातल्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे याकरीरता वरणगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाले व आज ते देश सेवेसह विविध क्षेत्रात आपली कामगिरी बजावत आहे. शुक्रवार, 27 रोजी दुपारी अडीच वाजता ज्ञान दिंडी व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
संतांचे जीवंत देखावे आकर्षण
शुक्रवारी निघणार्या दिंडीमध्ये महाराष्ट्राची परंपरा असलेले मावळे ग्रंथ, दिंडी संस्थेसाठी योगदान दिलेल्या माजी संस्थापक यांचे देखावे, स्त्री शिक्षण, महाराष्ट्रातील संतांचे जिवंत देखावे, राष्ट्रीय नेते, भारत माता, आपला पोशिंदा शेतकरी यासह अनेक झाक्या यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत लेझीम व बँड पथक आपली चुणूक दाखवणार असून मिरवणूक महात्मा गांधी विद्यालयापासून सुरू होऊन प्रभात फेरी मार्गाने बसस्थानक भोगावती नदी, पोस्ट गल्ली, चौधरी वाडा, गांधी चौक या मार्गाने महात्मा गांधी विद्यालयात पोहोचल्यानेर तिचा समारोप होईल.
या मान्यवरांची राहणार उपस्थिती
दिंडीचे उद्घान संस्थेचे शालेय समिती चेअरमन चंद्रकांत बढे करतील. अध्यक्षा वंदना पाटील, उपाध्यक्ष कमलाकर चौधरी, सचिव चंद्रशेखर झोपे सहसचिव संजय ढाके, सदस्य गोविंद मांडवगणे, जनार्दन पाटील, कैलास माळी, मधुकर पाटील, राजेंद्र चौधरी, रवी कोल्हे, संजय झोपे, सुभाष सराफ, दीपक मराठे, सुधाकर जावळे, नीळकंठ सरोदे, मुख्याध्यापक आर.ए.वाघ आदी उपस्थित राहतील. शनिवार, 28 रोजी या कार्यक्रमाचा समारोप होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे असतील. प्रमुख अतिथी म्हणून खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील, पदवीधर आमदार सुधीर तांबे शिक्षक आमदार किशोर दराडे, शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, उपशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण आदी उपस्थित राहतील. यावेळी 1944 मधील पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा सत्कार होईल. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, माजी संस्थाचालक, शिक्षण प्रेमी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दि वरणगाव एज्युकेशन संस्थेचे संचालक मंडळ व विद्यार्थी कृती समितीने केले आहे.


