वरणगावच्या महात्मा गांधी विद्यालयाचा माजी विद्यार्थ्यांचा लोणावळ्यात 29 रोजी मेळावा


वरणगाव : शहरातील शहात्मा गांधी विद्यालयाचे 2019 हे अमृत महोत्सवी वर्ष असून शनिवार, 28 रोजी शाळेचा अमृत महोत्सव साजरा होत असून इच्छा असूनही या मेळाव्यास उपस्थित राहू न शकणार्‍या 1990 च्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांनी या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पुणे, मुंबई, नाशिक अशा विविध शहरांमध्ये स्थायीक झालेल्या आणि डॉक्टर, अभियंते, उद्योजक, व्यावसायीक, नोकरदार व पत्रकार अशा विविध क्षेत्रात काम करून नावलौकीक मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचे रविवार, 29 डिसेंबरला लोणावळा येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनास दिलीप पाटील, योगेश कोल्हे, ललित पाटील, रवींद्र पाटील, प्रशांत वंजारी, योगिनी मांडवगणे यांच्यासह इतर माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित राहणार आहेत.


कॉपी करू नका.