साकेगावात ‘सरपंच चषका’साठी 24 संघातील खेळाडूचां कसून सराव

15 जानेवारी स्पर्धेचे आयोजन : विजेत्या संघास 33 हजार तर द्वितीय संघास 10 हजाराचे रोख बक्षीस
भुसावळ : तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत व जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटना, टेनिस क्रिकेट संघटनेतर्फे साकेगावयेथे 15 जानेवारी रोजी सरपंच चषक सीजन सहाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी गावातील 24 संघातील 360 खेळाडूंनी ऐन थंडीतही कसून सराव चालवला आहे. विजेत्या संघाचा वर्षभरासाठी फोटो ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात येणार असून विजेत्या संघास 33 हजार तर द्वितीय संघास 10 हजाराचे रोख बक्षीस आयोजकांतर्फे दिले जाणार आहे.
पाच वर्षांपासून यशस्वी आयोजन
गावातील खेळाडूंचे आरोग्य सुदृढ सुप्त गुणांना वाव मिळावे, निरामय आरोग्य राहावे, व्यसनापासून दूर राहून मैदानाची आवड निर्माण व्हावी गावाचा नावलौकिक व्हावा खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, पातळीवर खेळण्याची संधी मिळावी यासाठी ग्रामपंचायत साकेगाव जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच वर्षांपासून यशस्वी सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सरपंच चषक हा गावातील खेळाडूंसाठी पर्वणी असतो तर यात सहभाग घेण्यासाठी शासकीय व निमशासकीय सेवेत देशातील ठिकठिकाणी नोकरीसाठी गेलेले पोलिस, अभियंते, रेल्वे कर्मचारी, मक्तेदार हे गावात रजा टाकून स्पर्धेत सहभाग घेतात व साकेगाव सरपंच चषक उत्सवाचा आनंद द्विगुणित करतात.
ऐन थंडीतही खेळाडूंचा कसून सराव
राष्ट्रीय महामार्गावर जिल्हा परीषद शाळेच्या मैदानावर सरपंच चषकासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून मैदानाचे सपाटीकरण व विशेष मातीची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. या मैदानावर मानाचा सरपंच चषक पटवण्यासाठी खेळाडू सकाळ-दुपार-संध्याकाळ सराव करून घाम गाळत आहे.
विजेत्या व उपविजेत्या संघास रोख बक्षीस
सरपंच चषक स्पर्धेत विजेत्या संघास ग्रामपंचायत प्रशासनातर्फे 25 हजारांची तर माजी सरपंच आनंद ठाकरे यांच्याकडून पाच हजारांचे, डॉ.दीपक पाटील यांच्याकडून तीन हजार व सर्व मिळून 33 हजारांचे तर उपविजेत्या संघास जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे पाच हजारांचे पप्पू पटेल यांच्यातर्फे पाच हजारांचे असे 10 हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे तसेच राहुल चौधरी यांच्यातर्फे विजेत्या व उपविजेत्या संघास ट्रॉफी देण्यात येणार आहे
यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
सरपंच चषक यशस्वीतेसाठी सरपंच अनिल पाटील, माजी सरपंच आनंद ठाकरे, जिल्हा संघटनेचे सचिव वासेफ पटेल, रमजान पटेल राजू पटेल, सर्व टीमचे कॅप्टन, ग्रामपंचायत कर्मचारी, मॉर्निंग, सीसी क्लबसह आयोजन कमेटी परीश्रम घेत आहे.
पाच वर्षांपासून यशस्वी आयोजन
ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय, स्पर्धेत संधी मिळावी, तरुण पिढी निर्व्यसनी रहावी, मैदानावर घाम गाळावा या उद्देशातून सरपंच चषकाचे गेल्या पाच वर्षापासून यशस्वी आयोजन केले जात असल्याचे जळगाव जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल म्हणाले. दरम्यान, माजी सरपंच आनंद ठाकरे म्हणाले की, प्रभारी सरपंच असताना जिल्हा टेनिस बॉल संघटनेच्या सहकार्याने सुरू केलेला सरपंच चषक सहाव्या वर्षात पदार्पण करीत असून गावात सरपंच चषक उत्सव म्हणून साजरा होत असल्याचा मनस्वी आनंद आहे.


