यावलमध्ये नागरीकता संशोधन कायदा समर्थनार्थ मोर्चा


यावल : भारत सरकारच्या वतीने पारीत करण्यात आलेल्या सीएबी (कॅब) या नागरीकता संशोधन विधेयकाच्या समर्थनात गुरुवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मार्चात मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग होता. राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने गुरुवारी सकाळी 11 वाजता बोरावल गेट परीसरातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. स्वतःला थोर विचारवादी समजणारे या कायद्याच्या विरोधात जावुन देशात अराजकता माजाविण्याचे काम करीत असून देशातील काही संघटना या सीएबी नागरीकत्व संशोधन कायद्याच्या बद्दल देशवासीयांमध्ये अर्धवट व चुकीची माहिती पसरवून देशात मोठ्या प्रमाणाबर हिंसाचार करण्यात येत आहे. देशात अशा प्रकारे हिंसाचार पसरविणार्‍या व्यक्ती व संघटनांवर शासनाने योग्य ती चौकशी करून गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन यावल येथील निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना देण्यात आले.

यांचा मोर्चात सहभाग
यावेळी राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या या मोर्चाचे आयोजन राष्ट्रीय सुरक्षा मंचचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मोर्चाला पाठींबा देण्यासाठी माजी आमदार हरीभाऊ जावळे, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, माजी उपसभापती राकेश वसंत फेगडे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र वामन कोल्हे, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे, जिल्हा सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत, विलास चौधरी, माजी जिल्हा परीषद सदस्य हर्षल गोविंदा पाटील, जिल्हा परीषद सदस्या सविता अतुल भालेराव, मसाकाचे चेअरमन शरद जीवराम महाजन यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.


कॉपी करू नका.