रावेरात नागरीकत्व कायद्याला समर्थन : राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे रॅली


रावेर : सुधारीत  नागरीकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रावेरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी तहसील प्रशासनाला पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने संसद भवनात सुधारीत नागरीकत्व कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर देशभरात विविध निषेध मोर्चे व आंदोलने करण्यात येऊन या कायद्याला विरोध दर्शविला जात आहे. या कायद्याला समर्थन देण्यासाठी रावेर शहरात राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या माध्यमातून राजेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील गुरुवारी छोरीया मार्केटमधून समर्थन रॅलीला सुरुवातझाली. रॅलीमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी रावेर शहरातील 24 विविध संघटनांनी या रॅलीला आपला पाठिंबा दर्शविला. जामनेर येथील माजी संघटमंत्री मयूर पाटील यांनी मार्गदर्शन करील सीएए कायद्याची माहिती दिली व नायब तहसीलदार कविता देशमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

रॅलीत यांची होती उपस्थिती
यावेळी रॅली दरम्यान खासदार रक्षा खडसे, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, महेश पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, उमेश महाजन, भास्कर महाजन, यशवंत दलाल, अ‍ॅड.लक्ष्मण शिंदे, अमोल पाटील, अ‍ॅड.सुरज चौधरी, पप्पू चौधरी, संदीप सावळे, प्रल्हाद पाटील, राजेश शिंदे, तुषार महाजन, दिलीप पाटील, सुरेश शिंदे, पिंटू महाजन, चंद्रकांत माळी, उमेश महाजन, गोपाळ शिंदे, कालू बारी, संदीप महाजन, अजय महाजन, किरण महाजन, डॉ.अनंत अकोले, गणेश शिंदे, युवराज माळी यांच्यासह मोठ्या संखेने विविध हिंदूत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.