भुसावळात इच्छुकांच्या भाऊगर्दीने भाजपा शहराध्यक्ष निवड खोळंबली

भुसावळ : भाजपा शहराध्यक्ष पद निवडीसाठी शहरातील जळगाव रोडवरील लोणारी समाज मंगल कार्यालयात गुरुवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मात्र एका पदासाठी तब्बल 11 जण इच्छूक असल्याने व कुणाच्याही एकाच्या नावावर एकमत न होवू शकल्याने कोअर कमेटीकडे अहवाल पाठवून अंतिम निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यांची होती उपस्थिती
शहराध्यक्ष पद निवडीसाठी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस अजय भोळे, निवडणूक निर्णय अधिकारी हर्षल पाटील, सहा.निवडणूक अधिकारी रमाशंकर दुबे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराध्यक्ष पदासाठी तब्बल 11 जण इच्छूक
शहराध्यक्ष पदासाठी नगरसेवक किरण कोलते, परीक्षीत बर्हाटे, गिरीश महाजन, देवा वाणी, शिशिर जावळे, खुशाल जोशी, वासु बोंडे, राजू खरारे, अविनाश बर्हाटे, रमाशंकर दुबे व विद्यमान शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे यांनी इच्छूक म्हणून फार्म भरून दिले मात्र सायंकाळपर्यंत कुणाच्याही नावावर एकमत न झाल्याने पुरूषोत्तम नारखेडे, अविनाश बर्हाटे व रमाशंकर दुबे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यानंतर पदासाठी आठ जण इच्छूक असल्याने अखेर अहवाल कोअर कमेटीकडे पाठवून अंतिम निर्णय घेण्याचे ठरले.


