जामठी गावातून दुचाकी लांबवली


बोदवड : तालुक्यातील जामठी येथून अज्ञात चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवल्याची घटना 21 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार बापू जानकीराम सूर्यवंशी (लोणवाडी, ता.बोदवड) यांची दुचाकी (एम.एच.19 ए.क्यू.1937) अज्ञात चोरट्यांनी 21 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास जामठी गावातील नारायण पाटील यांच्या किराणा दुकानाबाहेरून लांबवली. तपास एएसआय संजय भोसले करीत आहेत.


कॉपी करू नका.