आरटीओ अधिकार्यांशी वादानंतर भुसावळात पथकाने जप्त केली तीन वाहने
वाहनधारकांमध्ये खळबळ : कागदपत्राविनाच सुरू होता वाहनांचा वापर

After an argument with the RTO officials, the team seized three vehicles in Bhusawal भुसावळ : आरटीओ अधिकार्यांनी टॅ्रक्टरवर कारवाई केल्यानंतर संशयीतांनी अधिकार्यांच्या ताब्यातील वाहने बळजबरीने नेल्याचा प्रकार मंगळवारी घडल्यानंतर नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर संबंधिताच्या मुजोरीला चाप लावण्यासाठी जळगाव प्रादेशिक परीवहन अधिकारी श्याम लोही हे तीन वाहनातून 12 पुरूष व महिला अधिकार्यांच्या ताफ्यासह राष्ट्रीय महामार्गावरील चाहेल ढाब्यावर बुधवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास धडकले. याप्रसंगी पथकाने कागदपत्रांविनाच वापरण्यात येत असलेल्या दोन टँकरसह ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई केली. भुसावळात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर आरटीओ अधिकारी आल्यानंतर शहरातील अवैध वाहनधारकांमध्ये कमालीची खळबळ उडाली.
वाहन ताब्यातून सोडवल्यानंतर दुसर्याच दिवशी वाहने केली जप्त
मंगळवारी महामार्गावर आरटीओ अधिकार्यांनी कागदपत्रे नसल्याने एका ट्रॅक्टरवर कारवाई केल्यानंतर संंबंधितानी अधिकार्यांशी हुज्जत घातली शिवाय आमच्यावर कारवाई केली जाते अन्य वाहने सोडली जातात, असे सांगून वाद वाढवत जप्त ट्रॅक्टर नेण्यात आल्याने आरटीओ अधिकारी गणेश लव्हाटे, भूषण मोरे यांनी नशिराबाद पोलिसात अदखलपात्र तक्रार दाखल केली व वरीष्ठांना घडलेला प्रकार कथन केला. वाहन चालकांच्या दादागिरीला चाप लावण्यासाठी स्वतः आरटीओ अधिकारी श्याम लोही 12 अधिकार्यांच्या पथकासह तीन वाहनातून राष्ट्रीय महामार्गावरील महामार्गावरील चाहेल पंजाब ढाब्यावर बुधवारी दुपारी धडकले. उभ्या असलेल्या ट्रॅक्टर, टॅकर यांची कागदपत्रांची मागणी केल्यानंतर गुरूमिंदर चाहेल यांच्याजवळ कुठल्याही वाहनाचे कागदपत्रे नसल्याने आरटीओ अधिकारी यांनी ट्रॅक्टर,
व दोन टॅकर जप्त केले. ढाब्यावरील बुलेटचीही तपासणी झाली मात्र कागदपत्रे सादर करण्यात आल्यानंतर ती सोडण्यात आली.
बाजारपेठ पोलिसांची धाव
कारवाईची माहिती कळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत परीस्थितीची माहिती जाणून घेत बंदोबस्त ठेवला.
अवजड वाहनांवरही कारवाईची मागणी
शहराला लागून असलेल्या महामार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरू असल्याने त्यावर निर्बंध लावण्यासह अवजड वाहनांवरही आरटीओ अधिकार्यांनी दंडात्मक कारवाई करून अप्रिय घटनांना आळा घालावा, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे


