भुसावळात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भुसावळ : शहरातील कोळी वाड्यातील शंकर बेकरीजवळील रहिवासी व संशयीत आरोपी उत्तम मीटकर उर्फ अण्णा याने पहिलीत शिक्षण घेणार्या अल्पवयीन सात वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी दुपारी 12 वाजता घडली. आरोपीविरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाण्यात पोस्कोचा गुन्हा दाखल झाला. चिमुकली बुधवारी अंगणात खेळत असताना मिटकरी याने टिव्ही पाहण्याच्या बहाण्याने त्या मुलीस घरात बोलावून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर संशयित मिटकर हा पसार झाला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


