पिंप्राळ्यात 29 रोजी ठाकूर समाजाचा विचार मंथन मेळावा

भुसावळ : महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाची विचार मंथन सभा जिल्हा जमात प्रमुख गोपाळ किसन ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, 29 रोजी सकाळी 11 वाजता कै.मोहनराव दगडू ठाकूर चॅरीटेबल ट्रस्ट पिंप्राळा येथे आयोजित करण्यात आली आहे. मागील सभेचे प्रोसेडींग वाचून कायम करण्यासह शासकीय कर्मचारी तथा विद्यार्थ्यांच्या नंदुरबार जात पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या बाबतीत चर्चा करून निर्णय घेणे आदींबाबत चर्चा करण्यात येणार असून प्रसंगी सुप्रीम कोटोच्या आदेशानुसार शासकीय कर्मचार्यांना वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भात शासन धोरणाचा विचार करणे संदर्भात विधीतज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. ठाकूर जमातीच्या सर्व पदाधिकार्यांनी तसेच शासकीय, निमशासकीय कर्मचार्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी मेळाव्यास उपस्थिती द्यावी, असे आवाहन ठाकूर समाज सेवा मंडळाचे सरचिटणीस प्रताप भास्कर सूर्यवंशी, उपाध्यक्ष एस.पी.ठाकूर, उपाध्यक्ष अंबादास ठाकूर व जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांनी केले असल्याचे जिल्हाध्यक्ष गोपाळ ठाकूर यांनी कळवले आहे.


