फैजपुरात एनआरसी समर्थनार्थ भव्य तिरंगा ध्वज रॅलीने वेधले लक्ष

वंदे मातरम भारत माता की जय घोषणांनी शहर दणाणले
फैजपूर : जयतु जयतु हिंदुराष्ट्रम, वंदे मातरम, भारत माता की जय, देश की रक्षा कोन करेगा हम करेंगे हम करेंगे, देश के सन्मान मे हम है मैदान में, आदी घोषणांनी शुक्रवारी फैजपूर शहर दणाणले होते. शहरात राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने नागरी सुधारणा कायदा समर्थनार्थ शहरातून भव्य 75 मीटर लांबीच्या तिरंगी ध्वजाची रॅली काढण्यात आली. शहरातील हिंदू धर्माचे आराध्य दैवत असलेल्या खंडेराव वाडी येथून शुक्रवारी दुपारी चार वाजता भारत मातेचे प्रतिमापूजन महामंडलेश्वर पुरुषोत्तम महाराज, शास्त्री माणेकरबाब, माजी आ हरिभाऊ जावळे, नगराध्यक्ष महानंदा होले यांच्या हस्ते पूजन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅली खंडेराव वाडी, जुने हायस्कुल, राम मंदिर, खुशालभाऊ रोड, सुभाष चौक, छत्री चौक या मार्गे प्रांतकार्यालयावर समाप्ती झाली. मुख्य मार्गाने हा मोर्चा घोषणा देत प्रांतकार्यालय पर्यंत काढण्यात आला यावेळी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना निवेदन देण्यात.
शिस्तप्रिय मोर्चाने शहरवासीयांची मने जिंकली
नागरिकत्व संशोधन कायदा समर्थनासाठी आज फैजपूर शहरातुन भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चायत महिलांची लक्षणीय उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती तसेच सुरवातील महिलांची उपस्थिती त्यानंतर 75 मीटर तिरंगा ध्वज धरलेले तरुण त्यांच्या पाठीमागे नागरिक अतीशय शिस्तप्रिय असे नियोजन करून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा मार्गावर महिलांनी रांगोळ्या काढून व पुष्पवृष्टी करून या मोर्चाचे स्वागत करण्यात आले
यांची होती उपस्थिती
महामंडलेश्वर पुरुषोत्तम महाराज ,शास्त्री मानेकर बाबा, भास्कर बाबा महाराज, प्रावीदासजी महाराज, माजी आमदार हरिभाऊ जावळे, नगराध्यक्ष महानंदा होले, जिल्हा दूध संघ संचालक हेमराज चौधरी, भाजप पालिका गटनेते मिलिंद वाघुळदे, मसाका चेअरमन शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, माजी नगरसेवक संजय महाजन, उद्योजक मोजनकुमार पाटील, जितेंद्र पवार, हर्षल पाटील, विलास चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष उमेश फेंगडे, डॉ कुंदन फेगडे, डॉ गणेश भारंबे, डॉ नितीन महाजन, डॉ सुनील पाटील, डॉ भरत महाजन, डॉ भाग्यश्री महाजन, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, अमोल निंबाळे, देवा साळी, नितीन राणे,दिव्यांग बांधवांचे अध्यक्ष नाना मोची यासह 15 हजारांवर नागरीक सहभागी झाले.
यांनी घेतले परिश्रम
राष्ट्रीय सुरक्षा मंच अध्यक्ष संदीप भारंबे, उपाध्यक्ष अनिल तेली, अनिरुध्द सरोदे, राजू महाजन, टेकचंद होले, दीपक पाटील, प्रशांत होले, प्रफुल कासार, यासह शहरातील महिला व पुरुष तरुण मोठ्या संख्यने उपस्थित होते. डिवाएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश वानखडे, पीएसआय साहेबराव पाटील, शिंदे यासह पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.


