मेहुणबारे बीटचे केंद्रप्रमुख अपघातात ठार


कवायत निरीक्षणासाठी जाताना भरधाव डंपरने दिली धडक

चाळीसगाव : करगाव आश्रमशाळेत कवायत निरीक्षणासाठी निघालेल्या केंद्रप्रमुखाला भरधाव डंपरने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शहराजवळील महामार्गावर घडली. लखीचंद एकनाथ कुमावत (55) असे मयत केंद्रप्रमुखाचे नाव आहे. अजितकुमार पाटील यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला असून डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले.

अन् गाठले मृत्यू
लखीचंद कुमावत हे शनिवारी सकाळी करगाव आश्रमशाळेत कवायत निरीक्षणासाठी जाणार असल्याने ते महामार्गावर शिक्षकाची वाट पाहत असतानाच भरधव खडीने भरलेला डंपर (क्र. एम.एच.19सीवाय 6611) ने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कुमावत यांच्या मानेवरुन चाक गेल्याने त्याचा चेहर्‍याचा पूर्ण चेंदामेंदा झाला. डंपर चालक यशवंत उर्फ पिंटू विष्णू पाटील (वय 40, रा.जुने गाव मेहुणबारे) यास ताब्यात घेण्यात आले आहे. कुमावत यांंच्या पश्‍चात पत्नी, मुलगी, मुलगी असा परीवार आहे.


कॉपी करू नका.