भुसावळ पालिकेत स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण
भुसावळ : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त भुसावळ नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी सव्वाआठ वाजता ध्वजारोहण होणार आहे. याप्रसंगी मुख्याधिकारी करुणा वसंतराव डहाळे, उपाध्यक्षा शेख सईदा शफी यांच्यासह नगरसेवकांची उपस्थित राहणार असून उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकार्यांच्या हस्ते
शासकीय ध्वजारोहण शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडक्र प्रांगण (डी.एस.ग्राऊंड) वर गुरुवारी सकाळी 9 वाजून पाच मिनिटांनी होईल. राष्ट्रीय पोषाखात नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन तहसीलदार महेंद्र पवार यांनी केले आहे.