एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी : बंदूक दाखवून लुटणार्‍यांची चौकडी अटकेत


Robbery at gunpoint in Jalgaon : Four accused in jail जळगाव : मध्यरात्री बंदुकीच्या धाकावर सहा संशयीतांनी लूटमार केल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासा एमआयडीसी पोलिसांनी चार संशयीतांना बेड्या ठोकल्या आहेत. कुसुंबा येथील दोघांना सोमवारी लुटण्यात आल्यानंतर खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करीत आरोपींना जेरबंद केले.

गोपनीय माहितीवरून चौघे जाळयत
देवेंद्र श्यामराव काळे (37) आणि त्यांचे मित्र मित्र शहा शाहिद शकील यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करीत सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास लुटले होते. या घटनेत मोबाईल व रोख रक्कम अशा 22 हजार रुपयांची लूट करण्यात आली होती. मूळचे पुणे येथील देवेंद्र काळे सध्या कुसुंब्यामध्ये भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत चौघे संशयीत निष्पन्न केले व ते जळागावच्या सुप्रीम कॉलनीतील असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या मुसक्या बांधण्या आल्या.







यांनी आवळल्या मुसक्या
एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, सतीश गर्जे, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे, मुकेश पाटील, राहुल रगडे यांनी मंगळवारी रात्री सुप्रीम कॉलनीतील चौघांना अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख व रतीलाल पवार करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !