सिन्नर खुनाने हादरले : ट्रक चालकाची निर्घृण हत्या


Sinner shocked by murder : Brutal killing of truck driver सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गाजवळ धोंडवीरनगर शिवारात अन्नपूर्णा हॉटेलनजीक ट्रक चालक युवकाची हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी मयत युवकाची दुचाकी व छोटीसी तलवार आढळली असून संपत रामनाथ तांबे (32, रा. गोंदे, ता.सिन्नर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

बुधवारी रात्रीची घटना
बुधवारी सव्वासात वाजेच्या सुमारास अत्यवस्थ युवक रस्त्याच्या कडेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिका चालकाने धाव घेतली. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस व सिन्नर पोलिसांनी धाव घेतली. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जूनराव भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी भेट देऊन तपासकामी सूचना केल्या.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !