जळगावच्या तरुणाने सातार्‍यातील तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडिओ केला व्हायरल


सातारा : जळगावातील एका तरुणाने सातार्‍यातील तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अनिलसिंह अजितसिंह चितौडिया (24, जि.जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
पीडिता 21 वर्षीय तरुणी असून आरोपी अनिलसिंह याने काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ जबरदस्तीने तयार केला होता. तो तिला वारंवार भेटण्यास बोलावत होता मात्र पीडितेनेे त्याला भेटण्यास नकार दिल्याने व्हिडीओ केलेले चित्रिकरण त्याने एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केले. या ग्रुपवर संबंधित तरुणीच्या काही ओळखीचे लोक होते. त्यांनी हा प्रकार पीडित तरुणीला सांगिल्यानंतर तिने सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सहायक फौजदार बागवान हे अधिक तपास करीत आहेत.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !