भरधाव आयशर व कारमध्ये अपघात : तरुण ठार ; दोघे जखमी


Bhardhaw Eicher and car accident : youth killed ; Both injured धरणगाव : भरधाव कार व आयशर वाहनात झालेल्या अपघातात हिरापूर गावातील तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील चिंचपूराजवळ घडला.

अपघातात तरुण जागीच ठार
गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चिंचपुराजवळ आयशर (एम.एच. 19 झेड. 9002) आणि वॅगन कार (एम.एच.04 डी.बी. 5941) यांच्यात धडक होवून कारमधील नरेश पाटील (30, हिरापूर, ता. पारोळा) हा तरुण जागीच ठार झाला तर समाधान पाटील (रा.तांडा खडके, ता.एरंडोल) हे जखमी झाला तसेच आयशर चालक देखील जखमी झाला. जखमींवर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 


कॉपी करू नका.