पाचोरात तालुक्यात 27 लाखांच्या गुटख्याची साठेबाजी : एकाला अटक, दोघे पसार


Gutkha hoarding worth 27 lakhs in Pachora taluka : One arrested, two absconded पाचोरा : चाळीसगावचे सहाय्यक पोलीसस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांनी गोपनीय माहितीच्या आधारे पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथून 26 लाख 86 हजार 368 रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून अन्य दोघे पसार झाले आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
तारखेडा येथील गोदामात गुटखा असल्याची माहिती मिळताच पथकाने अनिल छापा टाकला. संशयीत काशीनाथ वाणी (तारखेडा) यास विचारपूस केल्यानंतर प्रतिबंधीत गुटखा दिलीप एकनाथ वाणी व गोकुळ एकनाथ वाणी यांचा असल्याची कबुली दिली. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीसस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अजय अशोक पाटील, महेश अरविंद बागुल, राजेंद्र अजबराव निकम यांच्या पथकाने गुरुवारी रात्री ही कारवाई केलीे. कॉन्स्टेबल अजय पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.


कॉपी करू नका.