भुसावळातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला पनवेलमधून अटक


Abuse of minor girl in Bhusawal : Accused arrested from Panvel भुसावळ : शहरातील पु.ओ.नाहाटा कॉलेजच्या परीसरातून 27 जानेवारी एका अल्पवयीन मुलीला पळून नेण्यात आले होते. संशयीताविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पनवेलमधून संशयीताच्या मुस्क्या आवळल्या असून पीडीतेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयीताविरुद्ध पोस्कोचे कलम वाढवले असून संशयीताला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

फुस लावून तरुणीला पळवले
27 जानेवारी रोजी पु.ओ.नाहाटा कॉलेजच्या बाहेरून संशयीत राज जोहरे (18, भुसावळ) याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. याबाबत मुलीच्या वडिलांनी बाजारपेठ पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या साह्याने संशयीत व मुलगी हे पनवेल येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघांना 31 जानेवारी ताब्यात घेतले. मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर गुन्ह्यात पोस्कोचे कलम वाढविण्यात आले. बुधवारी संशयीताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी पुढील तपास सहा.निरीक्षक हरीष भोये, योगेश महाजन करीत आहे.


कॉपी करू नका.