भुसावळात बी.सी.बियाणी यांना आदरांजली


भुसावळ : बियाणी एज्युकेशन ग्रुपचे फाउंडर स्व.बी.सी.बियाणी (मामाजी) यांना नवव्या पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कांताबाई बियाणी, बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी, आमदार संजय सावकारे, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, अभियंता रोनक बियाणी, डॉ.मुस्कान बियाणी, पियुष बियाणी, एसएसजीबी आय.टी.आय.चे प्राचार्य एस.के.शुक्ला, गोपाळ ठाकूर, राजू पारीक, प्रवीण भराडीया, रमाकांत महाजन, महेंद्रसिंग ठाकूर, किरण कोलते, निक्की बत्रा, अजय नागराणी, किरण महाजन, प्रमोद सावकारे, भालचंद्र पाटील, सुनील महाजन, प्रशांत पाटील, अतुल झांबरे, रमेश नागराणी, संजय नाहाटा, देवा वाणी, सत्यनारायण गोडीयाले, गोपाल तिवारी, प्रल्हाद फालक यांच्यासह प्रिन्सिपल डी.एम.पाटील, रुद्रसेन गंठिया, कांचण जोशी तसेच बियाणी मिलिटरी स्कूल व बियाणी पब्लिक स्कूलचे शिक्षक वर्ग उपस्थित होते.

मामाजी भुसावळकरांच्या नेहमीच स्मरणात : आमदार
भुसावळचे आमदार संजय सावकारे म्हणाले की, मामाजी हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परीचीत होते. मामाजींनी हजारो लोकांना सढळ हातांनी मदत केली असून कित्येक लोकांना मदतीचा हातही दिला आहे. मामाजींच्या हस्ते त्यावेळी बरीचशी चांगले कामे झाली असून ती कायमस्वरूपी आमच्या स्मरणात व आठवणीत राहतील.


कॉपी करू नका.