आजाराला कंटाळून चिंचोलीतील प्रौढाची आत्महत्या


Suicide of an adult in Chincholi due to illness यावल : दीर्घ आजाराला कंटाळून चिंचोली गावातील समाधान गिरधर बडगुजर (48) यांनी आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकारानंतर यावल पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी हलवण्या आला.

दीर्घ आजाराला कंटाळून उचलले पाऊल
चिंचोली येथील समाधान गिरधर बडगुजर (48) हा इसम गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने आजारी त्रस्त होता. शुक्रवारी त्यांनी घरी कुणीही नसताना राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच तातडीने यावल पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवला. डॉ.शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह कुटुंबीयांना सोपवला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात राहुल बडगुजर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार असलम खान, हवालदार रवींद्र पाटील करीत आहे. मयताच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.


error: Content is protected !!