रावेर शहरातून 40 हजारांची दुचाकी लांबवली


40 thousand two-wheeler was extended from Rawer city रावेर : शहरातील बर्‍हाणपूर रोडवरील हॉटेल मामाश्री समोरून चोरट्यांनी 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रावेर पोलिसात गुन्हा
तक्रारदार किशोर देविदास पाटील (54, उटखेडा, ता.रावेर) यांनी त्यांच्या मालकिची व 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.एच.9176) ही रावेर शहरातील बर्‍हाणपूर रोडवरील हॉटेल मामाश्रीजवळ लावली असता चोरट्यांनी 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा दरम्यान संधी साधून चोरी केली. तपास नाईक अतुल तडवी करीत आहेत.


कॉपी करू नका.