भुसावळात दुचाकी घसरल्याने अंतुर्लीच्या युवकाचा मृत्यू


Youth of Anturli dies after bike falls in Bhusawal भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरजवळ दुचाकीवरून जाणार्‍या युवकाची दुचाकी स्लीप झाल्याने डोक्याला मार लागून युवकाचा मृत्यू ओढवला. 2 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनील कैलास पाटील (34, अंतुर्ली) असे मयत युवकाचे नाव आहे.

उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
सुनील पाटील हा युवक भुसावळ-जळगाव महामार्गावरून दुचाकीने जात असताना ट्रामा केअर सेंटरजवळ दुाकी घसरल्याने त्याच्या डोक्यास जबर मार बसल्याने ट्रामा केअर सेंटरमध्ये त्यास हलवण्यात आले मात्र त्यास अधिक उपचारार्थ हलवल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तपास हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहेत.


कॉपी करू नका.