माजी नगरसेवकांचे दातृत्व : शिवमहापुराण कथेसाठी 960 भाविकांना मोफत प्रवास


Philanthropy of Ex-Corporators : Free travel to 960 devotees for Shiva Mahapuran story भुसावळ : शहरातील माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी प्रभाग 24 मधील तब्बल 960 भाविकांना मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर येथे पं. प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवमहापुराण कथेसाठी मोफत प्रवासासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. स्वखर्चातून त्यांनी 16 लक्झरींद्वारे शुक्रवारी भाविकांना ही सुविधा पुरवली.

यांची होती उपस्थिती
या उपक्रमाचे उद्घाटन माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांच्यासह योगेश फालक, भुषण वराडे, प्रशांत ठाकूर, गजू पाटील, गजू काकडे, जगदीश वाघ, निखील पाटील आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !