लुटीच्या गुन्ह्यात पसार असलेला गुन्हेगार अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात


A criminal who is involved in the crime of robbery is in the Amalner police net अमळनेर : लूट प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीताला अमळनेर पोलिसांनी अटक केली. विशाल विजय सोनवणे (फरशी रोड, अमळनेर) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. विशाल विरोधात अमळनेर पोलीस स्थानकात लूट प्रकरणी गुन्हा दाखल होता. फायटरने मारहाण करत कपाळाला पिस्टल लावत खशातील हजार रूपयांची लूट केल्यानंतर संशयीत पसार होता.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलीस निरिक्षक विजय शिंदे यांना विशाल सोनवणे याच्याबात गुप्त माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी पथक तयार करून त्याला अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक विकास शिरोडे, हवालदार सुनील जाधव, चंद्रकांत पाटील, हिरालाल पाटील, सागर साळुंखे, राहूल चव्हाण, सुनील पाटील यांच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !