बंद घरातून 25 हजारांचा लॅपटॉप लांबवला
A laptop worth 25,000 was recovered from a closed house जळगाव :शहरातील कोल्हे नगर परीसरातील बंद घर फोडून चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप लांबवला. या प्रकरणी शनिवार, 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
समीर संजय तडवी (24, सावखेडासीम, ह.मु.कोल्हे नगर, जळगाव) हे वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरातील 25 हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप लांबवले. तडवी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आले. त्यांनी लागलीच रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सुशील चौधरी करीत आहे.








