भुसावळ तालुका पोलिसांची वॉश आऊट मोहिम : 22 हजारांचा माल जप्त

भुसावळ : भुसावळ तालुका पोलिसांनी तालुक्यातील साकेगाव, कुर्हा, किन्ही, खंडाळा, शिंगारबर्डी, वराडसीम, निंभोरा आदी ठिकाणी शुक्रवारी रात्रीपासून वॉश वाऊट मोहिम राबवत 225 लिटर गावठी हातभट्टीची तर 48 नग देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. कुर्हा येथे 15 तर साकेगाव येथे 33 अश्या 48 नग देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
कारवाईने उडाली खळबळ
डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व कर्मचार्यांनी कुर्हेपानाचे येथील किशोर बावस्कर यांच्या ताब्यातून 15 बाटल्या जप्त केल्या तर किन्ही गावात विजय गवळी यांच्या घरामागे असलेली दारूची भट्टी नष्ट केली तेथून 35 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. साकेगाव येथे रघुनाथ भोई यांच्याकडून अवैधरीत्या विक्री करीत असलेल्या 33 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या तसेच खंडाळा येथे अनिल कोळी यांच्या भट्टीवरून 35 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. शिंगारबर्डीतील देवेंद्र तायडे यांच्या घरातून एक हजार 750 रुपये किमतीची 35 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली तसेच वराडसीम येथे वासूदेव कोळी यांच्याकडून सुध्दा 35 लिटरची कॅन जप्त करण्यात आली व भिलाटी येथे नाल्याच्या काठावर सुरू असलेल्या भट्टी नष्ट करीत 35 लीटर दारू जप्त करण्यात आली तसेच निंभोरा येथे रवींद्र बैलम यांच्या येथून 50 लिटर दारू जप्त करण्यात आली दरम्या, 31 डिसेंबरपर्यत ही वॉश आऊट मोहिम राबवली जाणार आहे.


