रेल्वेखाली आल्याने कर्णबधीर व्यक्तीचा मृत्यू


भुसावळ : तालुक्यातील फेकरी येथे कचरा गोळा करणार्‍या मुका व बहिरा असलेल्या 47 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. फेकरी शिवारातील रेल्वे लाईनीजवळ खांब नंबर 448 / 25 ते 448/27 मध्ये कुठल्या तरी रेल्वे गाडीचा फटका लागून या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपस्टेान मास्तर कुणाल मोगरे यांनी दिलेल्या खबरीनुसार तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपासहवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहे.


कॉपी करू नका.