सेंट्रल बँकेसह मोबाईल कंपनीला रक्कम देण्याचे जिल्हा ग्राहक मंचचे आदेश


भुसावळातील ग्राहकाची ऑनलाईन फसवणूक : दावा अंशतः मंजूर

भुसावळ : भुसावळातील जामनेर रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे ग्राहक व रेल्वे कर्मचारी कृष्णाअर्जुन सुशीलकुमार रॉय यांनी बँकेकडे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक रजिस्टर केला होता मात्र 25 सप्टेंबर 2017 रोजी त्यांच्या खात्यातून एटीएमचा वापर करून भामट्याने एक लाख 21 हजार 540 रुपयांची रक्कम लांवबली. बँकेसह व्होडाफोन कंपनीला नोटीस दिल्यानंतर खोटे उत्तर देवून फसवणूक करण्यात आल्यानंतर रॉय यांनी जिल्हा ग्राहक मंचात दावा दाखल केला. यावेळी दावा अंशतः मंजूर करण्यात आला असून सेंट्रल बँकेसह मोबाईल कंपनीने वैयक्तिक व संयुक्तीकरीत्या 9 डिसेंबरनंतर 30 दिवसांच्या आत रॉय यांना एक लाख 21 हजार 540 रुपयांची रक्कम प्रत्यक्षात हाती मिळेपर्यंत दसादशे सहा टक्के दराप्रमाणे व्याजासह अदा करावे तसेच तक्रारदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक छळापोटी पाच हजार व तक्रारीच्या खर्चापोटी तीन हजार रुपये देण्याचे आदेश दिले. तक्रारदारातर्फे अ‍ॅड.राजेश एस.उपाध्याय यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड.जितेंद्र एस.भतोड व अ‍ॅड.विनोद तायडे यांनी सहकार्य केले. दरम्यान, मोबाईल कंपनीतर्फे बाजू मांडण्यास कुणीही हजर न झाल्याने त्यांच्यातर्फे एकतर्फी आदेश पारीत करण्यात आला.


कॉपी करू नका.