मुक्ताईनगरात भीषण अपघात : नाचणखेड्यातील दोघे तरुण ठार


Fatal accident in Muktainagar : Two youths from Nachankheda Killed मुक्ताईनगर :  विरूद्ध दिशेने भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात नाचणखेडा, जि.बर्‍हाणपूर येथील दोघा युवकांचा मृत्यू झाला. हा अपघात पातोंडी मार्गावरील नाचणखेडा रस्त्यावरील इंडियन ऑईल पेट्रोलपंपाजवळ सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी दुचाकी चालकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाचणखेड्यातील दोघे जागीच ठार
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली ते पातोंडी दरम्यान महामार्गावर सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भरधाव दुचाकी (एम.पी.68 एम.डी.5006) ने समोरून येणार्‍या दुचाकी (एम.पी.12 एम.जे.5117) ला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील योगेश ज्ञानेश्वर बाविस्कर व गणेश पंडित सैंगमिरे (रा. नाचणखेडा, जि.बर्‍हाणपूर) हे दोघे ठार झाले तर या अपघातात विकास सिरकारे आणि अन्य एक महिलादेखील जखमी झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर दुचाकीस्वार (एम.पी.68 एम.डी.5006) वरील दुचाकीस्वार पसार झाला आहे. या दुचाकीस्वाराविरोधात नितीन प्रकाश बाविस्कर (रा.नाचणखेडा, जि.बर्‍हाणपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रघुनाथ पवार करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !