शेती साहित्य ठेवलेल्या गोदामावर चोरट्यांचा डल्ला : शेतकर्याला 70 हजारांचा फटका
धरणगाव : तालुक्यातील बोरगाव येथे शेतकर्याने खळ्यात शेती साहित्यासह ट्रॅक्टरचे साहित्य ठेवल्याची संधी चोरट्यंनी साधल्याने शेतकर्याला 70 हजारांचा फटका बसला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांचा मोर्चा खळ्याकडे
धरणगाव तालुक्यातील बोरगाव गावात गजानन रवींद्र चव्हाण यांच्या मालकीच्या खळ्यातील गोदामात ट्रॅक्टर बॅटरी तसे अन्य साहित्य आणि वेल्डिंग मशीन यासह त्यांच्या उपयोगातील मशीन ठेवण्यात आले होते. रविवार, 5 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 12 वाजेनंतर अज्ञात चोरट्यांनी तब्बल 70 हजाराचे हे साहित्य लांबवले. या प्रकरणी गजानन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र भदाणे हे करीत आहेत.








