अट्रावल यात्रेमधून विवाहितेची सोन्याची पोत लंपास


Lumpas of the gold texture of the bride from the Atrawal Yatra यावल : तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबा यात्रेत गर्दीचा फायदा घेत एका महिलेची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लांबवली. यावल शहरातील गंगानगरातील रहिवासी महिला मुंजोबाच्या यात्रेत गेली असता ही घटना घडली.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
यावल शहरातील गंगानगर भागातील रहिवाशी अर्चना हेमंत पाटील या अट्रावल येथील मुंजोबाच्या यात्रेत दर्शनासाठी गेल्या असता गर्दीत कुणी तरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 15 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. हा प्रकार त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी यावल पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !