यावल तहसील कार्यालयात स्वस्त धान्य दुकानदारांचे निवेदन

रास्त मागण्या मान्य न झाल्यास रेशन वाटप बंदचा घेतला निर्णय


Statement of cheap grain shopkeepers in Yaval Tehsil Office यावल : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. 8 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत रेशन वितरण बंद आंदोलन करीत असल्याचे म्हटले आहे. विविध मागण्यासंदर्भात हे आंदोलन केले जाणार आहे. येत्या 22 मार्च रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर संसदेला घेराव आंदोलन करणार येणार असून या दरम्यान रेशन दुकान बंद राहतील, असे निवेदनात त्यांनी नमूद आहे.

निवेदन देवूनही समस्या ‘जैसे थे’
यावल येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे यावल तालुका प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्याचा आशय असा की, रेशन दुकानदारांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन देऊनही त्यांच्या समस्या सोडवण्यात आल्या नाही. आता रेशन दुकानदार 8ते 9 फेब्रुवारी आंदोलन करीत स्वस्त धान्य वितरण करणार नाहीत. त्यानंतरदेखील मागण्या मान्य न झाल्यास 22 मार्च रोजी दिल्ली येथे रामलीला मैदानावर आयोजित संसदेला घेराव या आंदोलनात तालुक्यातील रेशन दुकानदार जाणार आहेत व यादरम्यान त्यांची दुकाने बंद राहतील असे त्यांनी कळवले आहे. या निवेदनात त्यांनी राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेद्वारे सर्व परवानाधारकांना वर्ल्ड फुड प्रोग्राम अंतर्गत 440 रुपये प्रतिक्विंटल कमीशन व 50 हजार रुपये मानधन देण्यात यावे यासह विविध आठ मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळू नेवे, उपाध्यक्ष शेख अब्दुल्ला, सचिव दिलीप मोरे, नितिन महुरकर, सागर अंबादास पाटील, अजय कुचेकरसह मोठया संख्येत दुकानदार उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !