सांगवी बुद्रुक शिवारातून डिझेल इंजिनाची चोरी


Theft of diesel engine from Sangvi Budruk Shivar  यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक शेत-शिवारातून शेती पिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेले डिझेल इंजन अज्ञात चोरट्यांनी लांबवले. 12 हजार रुपये किंमतीचे डिझेल इंजिन चोरी केल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
सांगवी बुद्रुक, ता.यावल येथील गिरीश भास्कर कोळंबे यांचे सांगवी बुद्रुक शेत शिवारात गट क्रमांक 822 मध्ये शेत आहे. या शेताच्या बांधावर त्यांनी पिकाला पाणीपुरवठा करण्याकरीता लाल रंगाचे 12 हजार रुपये किंमतीचे डिझेल इंजन लावले होते व त्याद्वारे ते शेतात पिकाला पाणीपुरवठा करायचे. मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे हे डिझेल इंजिन चोरी केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश खडके करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !