फैजपूरात 13 रोजी एकदिवसीय सामूहिक श्री गजानन विजय महापारायण


ODI Mass Sri Gajanan Vijay Mahaparayan on 13th at Faizpur फैजपूर : शहरातील जय गजानन ग्रुपतर्फे आयोजित श्री गजानन महाराज यांच्या 145 व्या प्रकट दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे 13 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी एकदिवसीय श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण मुखोद्गत वक्ते मु कराड जिल्हा सातारा येथील श्री जयंत मराठे व सौ संजीवनी मराठे यांच्या रसाळ वाणीतून फैजपुरातील शिवाजी नगरात सकाळी साडे सात ते दुपारी अडीच वाजेपर्यंत होणार आहे.श्री व सौ मराठे यांचा श्री गजानन विजय ग्रंथ जसाच्या तसा तोंडपाठ आहे.

भाविकांना वाचण्यासाठी मिळणार ग्रंथ
ज्या भाविकांकडे ग्रंथ नसेल त्यांना वाचण्यापुरता उपलब्ध करून दिला जाईल. शारीरिक दृष्टया बसण्यास असमर्थ आहेत त्यांना पारायणा साठी खुर्चीची व्यवस्था केलेली आहे.तसेच पारायण करणार्‍यासाठी सकाळी फराळ व दुपारी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. या पारायान साठी सुमारे 1100 भाविक महाराष्ट्र,मध्यप्रदेश व गुजरात येथून आवर्जून हजर असतात.तसेच या पारायणाला प्रमुख पाहुणे महामंडलेश्वर परमपूज्य जनार्दन हरिजी महाराज सतपंथरत्न फैजपूर हे आहेत.सर्व पारायण कर्त्यासाठी फराळ व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी सर्व गजानन भक्तांनी या परायणाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती दीपक होले,दुर्गेश बोरोले ऋषभ काठोके,डॉ गौरव धांडे, गोपाळ भारंबे,निळकंठ पाटील, किशोर पाटील या कार्यकर्त्यांनी केली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !