जळगावातील व्यावसायीकाची घराबाहेरून दोन लाखांची चारचाकी लांबवली
A four-wheeler worth two lakhs was stolen from outside the house of a businessman in Jalgaon जळगाव : घराबाहेर लावलेली दोन लाखांची चारचाकी चोरट्यांनी लांबवल्याची घटना नेहरू नगरात घडली. या प्रकरणी बुधवारी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांनी महागडी कार लांबवली
जळगाव शहरातील नेहरूनगरात हेमंत मिठाराम बारी (49) हे व्यावसायीक वास्तव्यास आहेत. त्यांची शिरसोलीत स्टील वर्क्सची फॅक्टरी आहे. बारी यांच्याकडे स्वीप्ट (एम.एच.19 सी.एफ.0974) असून मंगळवार, 7 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता कार लावल्यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी संधी साधली. बारी यांच्या पत्नी सीमा यांना बुधवारी पहाटे पाच वाजता कारची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबाने सर्वत्र शोध घेतला व अखेर बुधवारी सकाळी 10 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ पठाण करीत आहे.








