सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : दोन तरुणींची पोलिसांनी केली सुटका
Sex racket busted : Two young women rescued by police नागपूर : शहरातील नरेंद्रनगरातील श्रद्धा इन हॉटेल येथे आरोपीकडून मुली पुरविल्या जात असल्याची टीप गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळताच पोलिसांनी डमी ग्राहकाद्वारे खातरजमा केल्यानंतर छापेमारीत करीत दोन मुलींची सुटका केली. आरोपी नीरज गणेश ठेबरे (26, भीमनगर, रामेश्वरी) याला अटक करण्यात आली.
दोघा तरुणींची सुटका
आरोपी नीरज हा त्यांच्या आर्थिक स्थितीचा फायदा उचलत पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घ्यायचा. दोन्ही मुलींची पोलिसांनी सुटका केली, तर नीरजविरोधात बेलतरोडी पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला








