अल्पवयीन मुलीचा विनयभंग : जळगावच्या तरुणाला पाच वर्ष शिक्षा
Molestation of minor girl : Jalgaon youth sentenced to five years जळगाव : जळगाव शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल खटल्यात आरोपी शेख आसीफ शेख नबी (24, रा. शिवाजीनगर परीसर, जळगाव) यास जळगाव जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच 15 हजार रुपये दंड सुनावला. ही शिक्षा बुधवार, 8 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता सुनावण्यात आली.
शहर पोलिसात दाखल होता गुन्हा
जळगाव शहरातील एका भागातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणी 11 सप्टेंबर 2018 रोजी घरी पायी जात असताना शेख असी शेख नबीने तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायासनापुढे चालवण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बहिणींची साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या.






दंडासह कारावासाची शिक्षा
न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याअंती न्या.बी.एस. महाजन यांनी शेख असीफ शेख नबी याला दोषी ठरवून भारतीय दंड विधान कलम 354 अ आणि बाललैंगिक अत्याचार अधिनियमाच्या कलमानुसार दोषी ठरवले. आरोपीला दोन्ही कलमांच्या अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास आणि 15 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अॅड.चारुलता बोरसे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.


