पहिलीतील मुलीचा विनयभंग : भुसावळात आरोपीला अटक

भुसावळ : शहरातील कोळी वाड्यातील शंकर बेकरीजवळील उत्तम मीटकर उर्फ अण्णा याने त्याच परीसरात राहणार्या सात वर्षाच्या आणि पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणार्या लहानग्या मुलीचा विनयभंग बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल होता. आरोपीला गुन्हा घडल्यानंतरपसार झाला होता. पोलिसांनी त्याला शुक्रवारी भुसावळ जंक्शनवर उतरताच त्याच्या मुसक्या आवळल्यात. त्यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पहिलीत शिक्षण घेत असलेल्या सात वर्षाची मुलगी अंगणात खेळत असतांना मिटकर यांने टिव्ही पाहण्याच्या बहाण्याने त्या मुलीस घरात बोलावून तिचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी दुपारी 12 ते 12.30 वाजेच्या सुमारास घडली होती. घटनेनंतर संशयीत मिटकर हा पसार झाल्यामुळे पोलिस त्याच्या मागावर होते. तो रेल्वे स्थानकावर येत असल्याची माहिती मिळाल्याने शहर पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी संशयीत मिटकर याला शुक्रवारी सायंकाळी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. डीवायएसपी गजानन राठोड पुढील तपास करीत आहे.


