यावलला काँग्रेसचे स्टेट बँकेसमोर धरणे आंदोलन


Yawal Congress protest in front of State Bank यावल : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने स्टेट बँकेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्यात. बुधवारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखा सातोद रोड, यावल येथे सकाळी 11 वाजता गौतम अदानी यांच्या उद्योग समुहातील गैर कारभाराची केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी स्टेट बँकेचे व्यवस्थापक विजय पी.टाले यांना यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यांची आंदोलनात उपस्थिती
या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील यांनी केले. आंदोलनात नगरसेवक शेख असलम शेख नबी, नगरसेवक समीर मोमीन, नगरसेवक मनोहर सोनवणे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष कदीर खान, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, कोरपावलीचे माजी सरपंच जलील पटेल, अमर कोळी, महिला काँग्रेस पदाधिकारी चंद्रकला इंगळे, आदिवासी विभागाचे बशीर तडवी, नईम शेख , राहुल गजरे, युवक काँग्रेस पदाधिकारी, एस.सी.विभाग पदाधिकारी, पक्षाच्या अल्पसंख्याक पदाधिकारी सेवा दलचे पदाधिकारी उपस्थित होते.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !