भुसावळातील तरुणाने सिगारेटसाठी पैसे न दिल्याने मारहाण : तिघांविरोधात गुन्हा
Bhusawal youth beaten up for not paying for cigarettes : Crime against three भुसावळ : सिगारेट पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकास तिघांनी बेदम मारहाण केली तसेच डोक्यावर लाकडी काठी मारून दुखापत करण्यात आली. ही घटना सोनिच्छावाडी, हॉटेल मल्हारजवळ सोमवारी रात्री 11 वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरोधात मंगळवारी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
सागर अशोक पवार (26, कृष्णानगर, चैतन्य आयुर्वेदीक हॉस्पीटल, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपीने सिगारेट पिण्यासाठी सोमवारी रात्री 11 वाजता पैसे मागितले मात्र ते न दिल्याने राग येवून संशयीतांनी दारूच्या नशेत लाथा-बुक्यांनी मारहाण केली तसेच डोक्यावर लाकडी काठी मारून दुखापत करण्यात आली. या प्रकरणी दादू सारवन, राहुल खरारे (वाल्मीक नगर, भुसावळ), बंटी नारळवाला (भुसावळ) यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गणेश चौधरी करीत आहेत.








