शिविगाळ केल्याचा जाब विचारल्याने भुसावळात तरुणाला मारहाण : त्रिकूटाविरोधात गुन्हा
A young man was beaten up in Bhusawal for asking for an answer for abuse : a crime against the trio भुसावळ : शिविगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून त्रिकूटाने तरुणास मारहाण केली. ही घटना जामनेर रोडवरील साईबाबा मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
आकाश दिलीप पुरी (26, साईबाबा मंदिराजवळ, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपींना सोमवारी सायंकाळी पाच वाजता शिविगाळ का करता ? असा जाब विचारल्याचा राग आल्याने त्यांनी लाकडी दांड्याने डाव्या हाताच्या कोपर्यावर मारहाण केली. तपास एएसआय सत्तार शेख करीत आहेत.








