कापूस चोरट्यांची चौकडी बोदवड पोलिसांच्या जाळ्यात


A quartet of cotton thieves in Bodwad police’s net बोदवड : शहरातील कापूस चोरट्यांच्या टोळीला बोदवड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 52 हजार रुपये किंमतीचा कापूस जप्त केला आहे. या कारवाईने अनेक चोर्‍यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोपनीय माहितीवरून चौघांना बेड्या
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, एपीआय अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने संशयित निखील जावरे (नेरकर कॉलनी), राहुल बडगुजर (सहकार नगर), समाधान मोरे (भिलवाडा), रोशन उर्फ अजय धुलकर (भिलवाडा), गणेश उर्फ विश्वनाथ माळी (सहकार नगर, बोदवड) यांना पकडल्यानंतर त्यांनी महावीर जिनिंगसह रखेड बु॥ येथील शेतकरी लक्ष्मण पाटील यांच्या गोदामातून कापूस लांबवल्याची कबुली दिली आहे तर गुन्ह्यात वापरलेली रीक्षा तसेच 52 हजार रुपये किंमतीचा सहा क्विंटल कापूसही काढून दिला आहे.







यांनी आवळल्या मुसक्या
कॉन्स्टेबल अयुब तडवी, नाईक राजेश महाजन, शशीकांत महाले, दीपक पाटील, मुकेश पाटील, निखील नारखेडे, नीलेश शिसोदे, भगवान पाटील, सहा. फौजदार सुधाकर शेजोळे आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या बांधल्या. तपास हवालदार रवींद्र गुरचळ व हवालदार वसंत निकम करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !