अंगणवाडी सेविकेची 50 हजारांची पोत लांबवली : जळगाव बसस्थानकातील प्रकार
Anganwadi worker’s texture of 50 thousand extended : Jalgaon bus station type जळगाव : बसस्थानकात बसच्या प्रतीक्षेत असलेल्या अंगणवाडी सेविकेच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीची पोत चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
पाचोरा तालुक्यातील बांबरूड राणीचे येथे सुनीता राजेंद्र सोनार (49) या अंगणवाडी सेविका असून बुधवार, 8 रोजी दुपारी चार वाजता त्या बसस्थानकात बसची प्रतीक्षा करीत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 24 ग्रॅम वजनाची व 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास हवालदार महेंद्र पाटील करीत आहेत.








