स्वतःमधील सवयी बदला, आयुष्य आपोआप बदलेल

अॅड.पल्लवी सुपेकर : कोटेचा महिला महाविद्यालयात वार्षिक पारीतोषिक वितरण
भुसावळ : विद्यार्थिनींनी नेहमी आत्मनिर्भर राहणे गरजेचे असून जे काम करायचं असेल ते जिंकणे वा हरणे आपल्या हातात नसलेतरी कृती मात्र आपल्या हातात असते, स्वतःमधील सवयी बदलल्यास भविष्य आपोआप बदलेल, असे विचार अॅड.पल्लवी सुपेकर यांनी व्यक्त केले. शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘उडान 2019’ च्या वार्षिक पारीतोषिक वितरण समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.
यांची प्रमुख उपस्थिती
संस्था सदस्या ललिता चोरडिया अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कायदेतज्ज्ञ अॅड.पल्लवी सुपेकर, संस्थाध्यक्षा पद्मा मोतीलाल कोटेचा, शिरीष नहाटा, निरंजना शहा, डॉ.संदीप जैन, निरंजन शर्मा, प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा, उपप्राचार्य डॉ.शिल्पा पाटील, डॉ.जनार्दन धनवीज, पर्यवेक्षक प्रा.आर.बी.भदाणे, स्नेहसंमेलन प्रमुख दीपाली पाटील, डॉ.सरोज शुक्ला, स्नेहसंमेलन सचिव कुमारी निकिता पाचपांडे, हर्षदा चौधरी, नियतकालिक प्रतिनिधी कुमारी दीक्षीता एझुवा उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा.आर.एच. पाटील तर प्रास्ताविक प्रा.दीपाली पाटील यांनी केले. उपप्राचाय डॉ.शिल्पा पाटील यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांना गौरवण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.निलेश गुरचळ, प्रा.स्मिता जयकर, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.अशोक निकम, प्रा.माधुरी भुतडा, प्रा.अपर्णा धीवरे यांनी केले.


